वृत्तसंस्था/ रायपूर
संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यापासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी जात जनगणनेच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. दरम्यान, आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही जातीनिहाय गणना करू, असे राहुल गांधी यांनी सोमवारी छत्तीसगडच्या दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात सांगितले.
छत्तीसगडच्या भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या गृहनिर्माण न्याय परिषदेच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पक्षाची सर्व निवडणूक आश्वासने पूर्ण करण्याबाबत भाष्य केले. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानची उदाहरणे देत त्यांनी निवडणुका जिंकल्यानंतर आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करतो, अशी हमी दिली.
पंतप्रधानांना आकडेवारी लपवायचीय : राहुल गांधी
काँग्रेस पक्षाने जात जनगणना केली होती. भारतात कोणत्या जातीचे किती लोक आहेत याची आकडेवारी त्यात आहे. नरेंद्र मोदींना हा डेटा जनतेला दाखवायचा नाही. मी संसदेत जात जनगणनेबद्दल बोललो तेव्हा पॅमेरा फिरवण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. सध्याचे सरकार खासदार व नेते चालवत नसून पॅबिनेट सचिव आणि विभाग सचिव चालवतात. या विभागांचे 90 सचिव प्रत्येक योजनेचे निर्णय घेतात. नरेंद्र मोदी सरकारच्या या 90 लोकांमध्ये मागासवर्गीय (ओबीसी) फक्त 3 लोक असल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या देशात फक्त 5 टक्के ओबीसी आहेत का? जात जनगणनेतूनच या प्रŽाचे उत्तर मिळू शकते, असे ते म्हणाले.









