वृत्तसंस्था/ पॅरिस
नॉर्वेच्या कॅस्पर रुडने या वर्षातील पहिले जेतेपद पटकावताना येथे झालेल्या इस्टोरिल ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या मिओमिर केसमानोविचचा पराभव केला.
पाचव्या मानांकित रुडने केसमानोविचवर 6-1, 7-6 (7-3) असा विजय मिळविला. पहिल्या सेटमध्ये त्याने सलग पाच गेम्स जिंकले. पण दुसऱया सेटमध्ये केसमानोविचने त्याला संघर्ष करण्यास भाग पाडले. रुडचे हे कारकिर्दीतील दहावे अजिंक्यपद आहे. यापैकी एक वगळता सर्व क्ले कोर्टवरील अजिंक्यपदे आहेत. या मोसमात याआधीच्या सहा स्पर्धांत त्याला एकापेक्षा जास्त सामने जिंकता आलेले नाहीत. या यशानंतर ताज्या मानांकनात तो आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.









