सावंतवाडी : प्रतिनिधी
Cashews from Konkan must be guaranteed!
कोकणातील प्रमुख उत्पन्न काजू पिकाला हमीभाव शासनाने दिलाच पाहिजे. सध्याच्या काजू सीझनमध्ये काजू अत्यंत कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे. कोकणच्या काजूची प्रत एक नंबरची आहे.तो चविष्ट असतो. हा काजू देशामध्ये चांगला काजू म्हणून ओळखला जातो. परंतु संघटितपणे काजू दर पाडून खरेदी केला जात आहे. यावर शासनाने लक्ष द्यावे. उर्वरित महाराष्ट्रामधील लोकप्रतिनिधी सतर्क राहतात. त्यामुळे तेथील शेतमालाला हमीभाव मिळतो. परंतु काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असूनही हमीभाव मिळत नाही. इथल्या तिन्ही आमदारांनी खासदारांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. हमीभाव मिळत नसेल तर असले लोकप्रतिनिधी हवेतच कशाला? इथल्या लोकप्रतिनिधीनी आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार यांचा प्रश्न कधी सभागृहात लावून धरल्याचे दिसले नाही. शासनाचे याची दखल घेऊन हमीभाव द्यावा किंवा शासनाने काजू स्वतः खरेदी करावा, असे साळगावकर म्हणाले.
बबन साळगावकर









