सावंतवाडी / प्रतिनिधी
वेर्ले येथे झाला शेतकरी मेळावा
काजू फळपीक विकास योजना, केंद्र शासन सहाय्यित प्रधान मंत्री सुश्म अन्न प्रक्रिया योजना गावागावांत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राबविणे आवश्यक असुन सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत ” श्री ” पध्दतीने भात लागवड करण्यासाठी भात बियाणे उपलब्ध होणार असून जे शेतकरी ” श्री ” पध्दतीने रोपं लागवड करु इच्छितात अश्या शेतकऱ्यांना संबंधित गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी वेर्ले येथील डॉ.लिंगवत सभागृह, फौजदारवाडी येथे जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व बादेकार मित्र मंडळ वेर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी केले.यावेळी मंडळ कृषी अधिकारी राजाराम शिंदे, कृषी सहाय्यक छाया राऊळ, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी कृषी विषयक मार्गदर्शन केले तर कृषी पर्यवेक्षक वाय्. बी. सावंत यांनी प्रात्यक्षिके दाखवुन उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्रालय अवल सचिव सौ.कौमुदी मर्गज यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत, सरपंच रुचिता राऊळ, ग्रामपंचायत सदस्या ममता राऊळ, ग्रामपंचायत सदस्या विद्या राऊळ, जेष्ठ नागरिक गोविंद लिंगवत, प्रगतशील शेतकरी लाडजी राऊळ, बादेकार मित्र मंडळाचे अध्यक्ष जानदेव लिंगवत, सचिव प्रसाद गावडे, विष्णूदास लिंगवत, कृषी सहाय्यक अक्षय खराडे, पी.पी.चव्हाण, एस.पी.पाटील उपस्थित होते.यावेळी स्वयंसेवी शेतकरी वसंत मोरजकर यांचा तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात वासुदेव राऊळ, पांडुरंग राऊळ, रत्नमाला राऊळ, अशोक गोसावी, विजय गोसावी, सुनील राऊळ, शरद राऊळ, अनिल गावडे, विजय राऊळ, देवीदास सावंत, अजित राऊळ, प्रशांत घोगळे, प्रकाश घाडी, विजया राऊळ, द्वारका लिंगवत, मोहिनी गावडे, सोनाली गावडे, प्रकाश मर्गज, बबन मर्गज, लतिकेश मेस्त्री, अनिल गावडे, अश्विनी गोसावी आधी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.कार्यक्रमाचे स्वागत डॉ.सई लिंगवत लिंगवत यांनी व तर आभारप्रदर्शन प्रसाद गावडे यांनी केले तर सुत्रसंचलन संदेश गोसावी यांनी केले.








