कोकरूड :
कोकरूड पोलीस ठाणे अंतर्गत गणेश उत्सव उत्साहात पार पडला. १७६ गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. त्यापैकी सातव्या दिवशी २१, आठव्या दिवशी ०८, नवव्या दिवशी १८, दहाव्या दिवशी २० व अनंत चतुर्दशीला १०८ मंडळांचे विसर्जन पार पडले. मिरवणूकीदरम्यान ध्वनीमयदिचा भंग करणाऱ्या १२ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दत्तक गणेश मंडळे ही संकल्पना राबवून पोलीस ठाण्याकडील एकूण २९ पोलीस अंमलदारांना १७६ मंडळाचे दत्तक मंडळी म्हणून वाटप करण्यात आले होते. तसेच पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतून गणेशोत्सव दहा कलमी कार्यक्रमाबाबत कोकरूड पोलीस ठाणेने जनजागृती केली होती. त्या संकल्पनेतून पणुंब्रे तर्फ वारूण येथे रक्तदान शिबिर मणदूर व कोकरूड येथे आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिर, वृक्ष लागवड व वृक्ष वाटप, विविध पथनाट्य व देखावे सादर करण्यात आले. पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनामुळे जास्तीत जास्त पोलीस अंमलदार हे मंडळापर्यंत पोचल्याने संपर्क वाढून सर्व शंका निरसन होऊन सण शांततेत व कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होता पार पडण्यास अतिशय मोलाची मदत झाली.
मोहरे कदमवाडी किन्नरेवाडी, मराठवाडी, येळापूर, खुंदलापूर अशा सहा ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पना साकारण्यात आली. पोलिसांनी वेळोवेळी डीजे व डॉल्बी सिस्टीम न लावण्याबाबत आवाहन केल्याने अनेक मंडळांनी मिरवणुका पारंपारिक वाद्यांमध्ये व बॅन्जो लावून नेल्या. मात्र, डॉल्बी-डीजे लावून ध्वनीमयर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १२ मंडळांवर गुन्हे दाखल आले. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांचे मार्गदर्शनात १७ पोलीस अंमलदार व १७ होमगार्ड बंदोबस्ताकरिता होते.








