निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी
बेळगाव : जुने हुबळी पोलीस स्थानकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवरील खटले मागे घेण्याचा प्रकार निंदनीय असून, सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी मजगाव ग्रामस्थ पंचमंडळ व हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले आहे. बाळाराम मजुकर, प्रवीण पालेकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी यामध्ये भाग घेतला होता. 10 ऑक्टोबर 2022 रोजी जुने हुबळी पोलीस स्थानकावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पोलीसही जखमी झाले आहेत. तरीही मुस्लीम व्होटबँकसाठी सरकारने हल्लेखोरांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, सरकारने आपला निर्णय त्वरित बदलावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









