वृत्तसंस्था/ मँचेस्टर
येथे सुरू असलेल्या एफ चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी ख्घ्sळवण्यात आलेल्या मँचेस्टर युनायटेड संघाने रिडींग संघाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत या स्पर्धेच्या पाचव्या फेरीत प्रवेश मिळवला. ही स्पर्धा सेकंड टियर दर्जाची आहे. मँचेस्टर युनायटेडच्या विजयामध्ये ब्राझीलच्या कॅसमिरोने दोन गोल नोंदवले.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. 54 व्या मिनिटाला कॅसमिरोने मँचेस्टर युनायटेडचे खाते उघडले. 56 व्या मिनिटाला 25 मी. अंतरावरून कॅसमिरोने आपला वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल केला. मँचेस्टर युनायटेडचा तिसरा गोल प्रेडने नोंदवला. रिडींगतर्फे एकमेव गोल पॉल इनेसिने केला.









