देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे जेसीबी चोरीप्रकरणी लांजा येथील तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात १ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबतची फिर्याद जेसीबी चालक अनिल सोमू राठोड (रा. इंगळेश्वर, ता. बसतबागेवाडी, जि. विजापूर) याने दिली. राठोड हा सध्या कामानिमित्त पाली जानमचाळ येथे राहतो. राठोड याने जेसीबी (क्र.एमएच-०८, जी-९३७०) सत्यवान खेडेकर यांच्या घरासमोर लावून ठेवला होता. प्रकाश कृष्ण राणे (रा. लांजा) याने कोणत्याही प्रकारची लेखी सूचना ने देता सहमतीशिवाय हा जेसीबी चोरून नेल्याचे अनिल राठोड याने फिर्यादीत नमूद केले आहे.
Previous Articleकेजी टू पीजीचे शिक्षण मोफत मिळावे
Next Article पंचायत समित्यांना वाहनांचे वितरण








