बेंगळूर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांची माहिती : विधानसौध पोलिसांकडून तपास सुरू
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी राज्य सरकारने आता कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी बेंगळूरमधील विधानसौध पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बेंगळूर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी ही माहिती दिली आहे.
कोविड काळातील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने न्या. जॉन मायकल कुन्हा यांच्या नेतृत्त्वाखाली आयोग स्थापन करून अहवाल मागविला होता. आता विधानसौध पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. आगामी दिवसांत कोणत्या प्रकारे तपास करावा, याविषयी राज्य सरकार निर्णय घेईल, असे बी. दयानंद यांनी सांगितले.
राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत एसआयटीमार्फत केविड गैरव्यवहारासंबंधी तपास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप एसआयटी स्थापन करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या विधानसौध पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सरकार पातळीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री यांचा समावेश असणारी उपसमिती न्या. जॉन मायकल कुन्हा यांच्या नेतृत्त्वाखालील आयोगाने सादर केलेला अहवाल पडताळत आहे. अहवालातील मुद्द्यांच्या आधारे पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे.
एसआयटी स्थापन करणे आवश्यक : दिनेश गुंडूराव
कोविड काळातील गैरव्यवहारासंबंधी तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करणे आवश्यक आहे. अलीकडेच मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. कोविड गैरव्यवहारसंबंधी एकेक गुन्हे दाखल होत आहे. या सर्वांना एकत्रित करून एसआयटीकडे सोपविणे गरजेचे असल्याची सरकारला जाणीव झाली आहे.मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला तरी अद्याप एसआयटी स्थापन झालेली नाही. आगामी दिवसांत याबाबत कार्यवाही केली









