सीबीआयने आज एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर आरोप न लावण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आर्यन खानला 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार्या एनसीबीने आर्यन खानला क्लीन चिट दिली तर अमली पदार्थ विरोधी एजन्सीने स्थापन केलेल्या एसआयटीने वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील तपासात त्रुटी असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांच्यावर 25 कोटीचा लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात येऊन एफआयआर दाखल करण्यात आला. या घडामोडीदरम्यान सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घराची झडतीही घेतली गेली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमध्ये शहरांमध्ये एकूण 29 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सांगितले.