कडेगाव : येथे ‘पिझ्झा हट’ कॅफे (Pizza Hut Cafe) सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात येथील फाळकूटदादांनी एक लाखाची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कॅफे मालक संकेत विकास मोहिते (येवलेवाडी, ता. कडेगाव) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (ता.२६) घडली. याप्रकरणी व्यापारी संघटनेने गुरुवारी (दि. २७) शहरात बंद पाळून निषेध केला.
कडेगाव पोलिसांनी याप्रकरणी आतिष कांबळे, अश्विन माळी, शिवेंद्र सूर्यवंशी (सर्व कडेगाव) या तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी याप्रकरणी शिवेंद्र सूर्यवंशी (कडेगाव) याला अटक केली, तर अन्य एका अल्पवयीन संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कडेगाव येथे तडसर रस्त्याला फिर्यादी संकेत मोहिते यांचे ‘पिझ्झा हट कॅफे आहे. बुधवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संशयित आतिष कांबळे, अश्विन माळी, शिवेंद्र सूर्यवंशी, अन्य एक अल्पवयीन संशयित असे चौघे मिळून संगनमत करून फिर्यादी संकेत मोहिते यांच्या येथील तडसर रस्त्यावरील ‘पिझ्झा हट’ कॅफेमध्ये गेले. तसेच त्यांना कॅफे सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास फिर्यादी व कॅफे चालक संकेत मोहिते यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी संशयित शिवेंद्र सूर्यवंशी याला अटक केली आहे, तर अन्य एका अल्पवयीन संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले. आतिष कांबळे व अश्विन माळी या दोघा संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत. या घटनेची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे करीत आहेत. दरम्यान गुरुवारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाराम गरुड यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेने रस्त्यावर उतरून खंडणी बहाद्दर फाळकूटदादांच्या निषेधार्थ सर्व व्यापारी पेठ बंद ठेवली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








