जत, प्रतिनिधी
हिवरे (ता.जत) येथे एका युवकाने आत्महत्या केली होती.ही घटना मंगळवारी घडली होती. आत्महत्याचे कारण सुरुवातीस स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, मयत अमृत शिवाजी पाटील (वय -३४) (रा. इरळी ता.कवठेमंहकाळ) या युवकाच्या खिशातील चिठ्ठीत खोटा अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाल्याने व मानसिक त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचा मजकूर आहे. याबाबत संशयित सात जणाविरुद्ध मारुती शिवाजी पाटील (रा.इरळी) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
मयत अमृत पाटील यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती सतीश लांडगे ,सतीश उर्फ हणमंत लांडगे ,वैशाली मधुकर साबळे,बबन पांडुरंग लांडगे ,लक्ष्मी बबन लांडगे ( रा.इरळी), शिवाजी जावीर रा.घेरडी , व पवनी ठोकळे रा. कडलास ता. सांगोला या सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, इरळी ता.कवठेमंहकाळ येथील मयत अमृत उर्फ लालासो पाटील व संशयित लांडगे,व साबळे यांच्यात काही कारणावरून वाद होता. या वादातूनच मयत लालासो पाटील यांच्यावर गुन्हा अट्रासिटी दाखल झाली होता. या कारणातून लालासो पाटील यांनी हिवरे येथे (दि.२८ मार्च )रोजी आत्महत्या करण्यात आली होती. परंतु पाटील यांच्या खिशातील सापडलेल्या चिठ्ठीत संशयित आरोपीच्या नावाचा उल्लेख करत मला खोट्या केसेस मध्ये गोवण्यात आले आहे. संबंधित लोक अजूनही गुन्हे दाखल करणार आहे या त्रासातून मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या कारणावरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








