जत, प्रतिनिधी
जत येथील एका डॉक्टरकडून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संशयित चौघावर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित आरोपींनी मोबाईल वरून कॉल करून १५ लाखाची खंडणी मागितली आहे.रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे.याप्रकरणी डॉ.कुलदीप आदिनाथ सावंत (रा.शंकर कॉलनी जत) यांनी जत पोलिसात फिर्यादी दिली आहे.
खंडणी मागितल्याप्रकरणी इराणा शिवराम भिसे (वय २७) व अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी रात्री उशिरा संशियत आरोपी इराणा भिसे यास ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहरात पुन्हा खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी,शहरातील शंकर कॉलनी येथे सावंत यांचा दवाखाना आहे.दरम्यानच्या कालावधीत संशयित आरोपी इराणा भिसे व त्यांच्या अन्य तिघा साथीदारांनी गेल्या तीन दिवसापासून आमच्या जेवणाचा सर्व खर्च भागवा अन्यथा बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली आहे.तसेच पंधरा लाखाची खंडणीची मागणी केली होती.याबाबत डॉ. सावंत यांनी पोलिसात धाव घेतली आहे.याप्रकरणी गुन्हा नोंद असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लवटे करत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








