सातारा,प्रतिनिधी
Udayanraje Bhosale Satara News : कृषी बाजार समितीच्या जागेवरून झालेल्या वादामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या वादावादी नंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात उदयनराजे यांच्यासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक विक्रम पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, संशयतांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी नगराध्यक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. खासदार उदयनराजे, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्निल गुजाळे, गणेश जाधव, पंकज मिसाळ, सतीश माने, जितेंद्र कानविलकर, सोमनाथ उर्फ काका धुमाळ अभिजीत मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड,किशोर शिंदे यांच्यासह 50 जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमवणे दमदाटी करून नुकसान करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.









