वृत्तसंस्था /नवी दिल्ली
युरोपमधील प्रसिद्ध ऑटो शो आयएए मोबिलिटी-2023 मध्ये, सर्व प्रमुख कंपन्यांनी प्रगत वैशिष्ट्यो आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह आपल्या कारचे प्रदर्शन केले आहे. कनेक्टिव्हिटी आणि अलर्ट यांसारख्या वैशिष्ट्यांच्या पलीकडे, या कार आता हाय-टेक वैशिष्ट्यांसह ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आरामदायी करुन देण्यासाठीच्या तयार केल्या आहेत. ऑडी क्यू 6 ई-ट्रॉनच्या एचयूडी प्रणालीमुळे अपघाताची शक्यता मिटणार आहे. रेनॉच्या नवीन कारची रचना टिकाऊ मॉडेल्सना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. चीनी कार निर्माता कंपनीच्या मिनीव्हॅनने वैशिष्ट्यांच्याबाबतीत सर्वांना मागे टाकले आहे.
ऑडी क्यू 6 ई-ट्रॉन: ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र क्रीन
3-डी इंटीरियरने सुसज्ज असलेल्या या ईव्हीमध्ये इन्फोटेन्मेंटसाठी डॅशबोर्डवर 3 डिस्प्ले आहेत. रेनॉ सीनिक: एका सूचनेवर काचेच्या छताचा रंग बदलण्याची सोय यात असणार आहे. या कारमध्ये 24 टक्के रिसायकल मटेरियल वापरण्यात आले आहे. याशिवाय ते 90 टक्के पुनर्वापर करण्यायोग्य आहे. व्हॉइस असिस्टंट या बटणाने छताचा रंग ढगाळ किंवा सामान्यमध्ये बदलू शकतो. सिंगल चार्जिंगवर ही गाडी 619 किमीची रेंज देते.









