वृत्तसंस्था / लंडन
क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आलेल्या इंग्लंडच्या संघात एक परिवर्तन करण्यात आले आहे. जखमी खेळाडू रीस टोपले याच्या स्थानी वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स याचा समावेश करण्यात आला आहे. ही माहिती जागतिक क्रिकेट संघाकडून सोमवारी देण्यात आली. कार्सच्या समावेशाला या स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल समितीने दुजोरा दिला आहे. इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिकेसमवेतच्या सामन्यात गेल्या शनिवारी टोपले याचे क्षेत्ररक्षण करताना बोट मोडले होते. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील उरलेले सर्व सामने खेळणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे त्याला परत पाठवून कार्स याचा समावेश संघात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









