पारा वाढला, नागरिक हैराण, पालेभाज्यांची खरेदी
बेळगाव : दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत गाजर, काकडी, बीज, हिरव्या पालेभाज्या आणि रसाळ फळांना मागणी वाढू लागली आहे. किरकोळ बाजारात हिरव्या भाज्याबरोबर फळांची खरेदी होऊ लागली आहे. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे शरीराला थंडावा देणारा भाजीपाला, फळांना अधिक पसंती दिली जात आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस दाखल झाला आहे. मात्र संत्रे, मोसंबी, कलिंगड, द्राक्षे आदी फळांची खरेदी केली जात आहे. त्यामुळे फळांचे दर देखील चढेच आहेत. बाजारात गाजर 80 रू. किलो, काकडी 80 रू किलो. बीज 30 रू. एक असा दर आहे.
वाढत्या उन्हामुळे पालेभाज्यांची अधिक प्रमाणात खरेदी
वाढत्या उन्हामुळे पालेभाज्यांची अधिक प्रमाणात खरेदी केली जात आहे. मेथी, कांदापात, पालक, शेपू आदींसह रसाळ लिंबूंची चलती पहावयास मिळत आहे. दुपार उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे लिंबू खरेदी केले जात आहेत. सहा ते सात रूपये एक प्रमाणे लिंबू विक्री होऊ लागले आहेत. वादळी पावसामुळे मध्यंतरी भाजीपाला पिकाला फटका बसला होता. त्यामुळे भाज्याचे दर वाढलेले आहेत.
हापूस आंब्याच्या आवकेत वाढ
सध्या यात्रा-जत्रा आणि लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याबरोबर फळांना मागणी वाढू लागली आहे. पालेभाज्या आणि फळांच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने सर्व सामान्यांना खरेदी करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. विशेष बाजरात हंगामानुसार हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. दर काहीसे खाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्याक्ंाढडून खरेदी करण्यात येत आहे.









