वार्ताहर /तवंदी
तवंदी घाटात ट्रेलरला अपघात झाल्याने ट्रेलरमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास हॉटेल हिल पॅलेसनजीक घडली. ट्रेलर पुण्याहून धारवाडकडे ट्रकचे हाऊसिंग साहित्य घेऊन चालला होता. दरम्यान, तवंदी घाटात बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर दुभाजकाला धडक देऊन विरुद्ध दिशेला जाऊन उभारला. परंतु त्यातील साहित्य महामार्गावर विखुरले गेले. त्यामुळे साहित्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झालेली नाही.









