दोन्हीं बाजूंची वाहतूक बंद,एसटीसह खाजगी वाहनातील प्रवाशांची मोठी गैरसोय.
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
तिलारी घाटमार्गे गोवा येथे मालाची वाहतूक करणारा कंटेनर घाटातील एका वळणदार रस्त्यावर आला असता चालकाला अरुंद रस्त्यात हे वळण घेताना अडचण निर्माण झाल्याने अडकून पडला. यात पूर्णच रस्ताच व्यापल्याने दोन्हीं बाजूची वाहने अडकून पडली असून एसटीसह खाजगी वाहनातील प्रवाशांसह शनिवारी आठवडा बाजारासाठी येणाऱ्या भाजी व्यावसायिक यांची मोठी गैरसोय झाली आहे. घाट रस्त्याच्या दोन्हीं बाजुंनी वाहनांची रांगच रांग लागली आहे.अनेक वाहनांना माघारी फिरावे लागले.घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस आणि सहकारी पोहचले असून हा अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याची कार्यवाही सुरू केली.









