सावंतवाडी : प्रतिनिधी
शिक्षणमंत्री केसरकर यांची संकल्पना
शालेय शिक्षणमंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून इयत्ता दहावी व बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी चिकित्सक समूह, मुंबई आणि सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे २२ मे रोजी ॲप्टीट्यूड टेस्टवर आधारित करिअर समुपदेशन आयोजित केले आहे.
यामध्ये महाराष्ट्र शासनमान्य, प्रशिक्षित तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अभिक्षमता चाचणी (Aptitude Test ), बुद्धिमत्ता चाचणी (Intelligence Test) , अभिरुची चाचणी (Interest Test), व्यक्तिमत्त्व चाचणी (Personality/Adjustment Test) अशा मानसशास्त्रीय चाचण्या घेतल्या जातील व निष्कर्षाचे समुपदेशन सहभागी विद्यार्थी व पालकांना करण्यात येईल. या नावीन्यापूर्ण उपक्रमासाठी चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर उपस्थित राहणार आहेत. सदर *मार्गदर्शनाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क – 8169802716 / 9579568200.