शस्त्रक्रिया महिला रुग्णांना वरदान : हृदयासंबंधी व्याधी असणाऱ्या रुग्णांना होणार लाभ
बेळगाव : अरिहंत हॉस्पिटलमध्ये मिनिमम इन्वेसिव्ह कार्डियाक सर्जरी (एमआयसीएस) यशस्वीपणे करण्यात आली. शिल्पा बसप्पा गडदी (रा. तुक्कानट्टी, ता. गोकाक) या मुलीला कित्येक दिवसांपासून धाप लागून श्वास घेण्यास त्रास होत होता. पालकांनी हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याकडून तिची तपासणी केली. तपासणी व चाचण्याअंती तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे निष्पन्न झाले. पालकांच्या संमतीने 15 फेब्रुवारी रोजी एमआयसीएस या आधुनिक पद्धतीने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व दि. 20 रोजी तिला घरी पाठविण्यात आले. आज रक्तदाब व हृदयाच्या जीवनशैलीशी संबंधित आजारांना अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, आता हृदयासंबंधी व्याधी असणाऱ्या ऊग्णांवर कमी त्रास व कमी चिरफाड (इन्सिशन) करून प्रगत व आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. आता एमआयसीएस ही शस्त्रक्रिया कमी त्रासाची आहे. हृदयाची पारंपरिक शस्त्रक्रिया अजूनही मुख्य आधार असला तरी एमआयसीएस ही शस्त्रक्रिया अत्यंत परिणामकारक आहे. ओपन हार्ट सर्जरीमध्ये 7 ते 8 इंच इन्सिशन करण्यात येते. मात्र, एमआयसीएसमध्ये 3 ते 4 इंच इन्सिशन करण्यात येते. ही शस्त्रक्रिया उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी निर्माण करणारी आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महिला ऊग्णांसाठी वरदान आहे.
हृ दय शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि धोकादायक हृदयाच्या भागातील दोष दूर करण्यासाठी केल्या जातात. हृदय शस्त्रक्रिया म्हटलं की पायाखालची वाळूच सरकते. पूर्वी हृदय शस्त्रक्रियेसाठी खूप कालावधी लागायचा आणि चिरफाडही (इन्सिशन) व्हायची. आता आधुनिक पद्धतीने व कमी इन्सिशन करून शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. शिल्पा हिच्यावरही डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे यांनी एमआयसीएस या आधुनिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता शिल्पाची प्रकृती स्थिर असून हॉस्पिटलच्यावतीने तिला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शिल्पाच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मिनीमम इन्वेसिव्ह कार्डियाक सर्जरीवर जोर : डॉ. एम.डी.दीक्षित

मिनिमम इन्वेसिव्ह कार्डियाक शस्त्रक्रिया (एमआयसीएस) ही अत्यंत परिणामकारक व कमी त्रासाची आहे. अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. ऊग्णांना अधिक त्रास होणार नाही याची काळजी घेऊन अरिहंत हॉस्पिटलने एमआयसीएस प्रक्रियेवर भर दिला आहे, ज्याचा ऊग्णांना लाभ होणार आहे.
‘एमआयसीएस’चे फायदे
- संसर्गाचा धोका कमी
- कमी रक्तस्त्राव
- 4 ते 5 दिवस ऊग्णालयात मुक्काम
- कामावर लवकर ऊजू होऊ शकतो
- 3 ते 4 इंच इन्सिशन
‘एमआयसीएस’ अंतर्गत शस्त्रक्रिया
- बायपास
- हृ दयाला छिद्र (एएसडी)
- झडप बदलणे









