कोल्हापूरः
प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी कोल्हापुरात आणली आहे. पोलिसांनी चंद्रपुरातून गाडी कोल्हापुरात आणली आहे.
धीरज चौधरी या व्यक्तीची ही गाडी आहे. कोरटकर याच गाडीतून चंद्रपूरातून तेलंगणाकडे गेला होता. कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयात आणून गाडी ठेवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गाडी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली आहे.









