प्रतिनिधी / वाळपई
ब्रह्माकरमळी नगरगाव येथे नव्याने उभारण्यात येणार पुलाच्या बगल रस्त्यावर आज संध्याकाळी कार उलटून अपघात घडला, यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये काराचे मोठे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची माहिती अशी की, ब्रह्माकरमळी येथे नवीन पुलाच्या बांधकामाला दोन दिवसेंपूर्वी सुऊवात करण्यात आलेली आहे. सदर मार्गावरून पुढे जाणाऱ्या शेळट, शिगंणे त्याचप्रमाणे ब्रह्मकरमळी नागरिकांना जाण्यासाठी अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे बगल रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र रस्ता अत्यंत धोकादायक आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत काही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आज दुपारी शिंगणे येथे रघुनाथ गावस यांची कार अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या चरात कोसळली व तो त्याची मुलगी जखमी झाली. हा अपघात एवढा गंभीर स्वरूपाचा होता की कार अक्षरशा चरामध्ये उलटली. त्यामुळे रघुनाथ गावस व त्याच्या मुलीला बाहेर काढताना खूपच त्रास झाला. स्थानिकांनी तातडीने मदत करत दोघांनाही वाळपई सरकारी ऊग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले. दोघांची प्रकृती स्थीर आहे.
सदर रस्ता धोकादायक स्वरूपाचा असून रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेले चर यामुळे धोक्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे बगल रस्त्यावरून निर्माण झालेल्या धोका यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी चांगला बनवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









