प्रतिनिधी / पर्वरी
येथील विधानसभा संकुलासमोरील उतरंडीवर कार उलटण्याची घटना गुऊवारी घडली, यामध्ये कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुऊवारी (दि.6) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार क्र. जीए-05-टी-4930 रस्त्याकडील वीज खांबाला धडकून पलटी झाली. सुदैवाने कारचालक मकबूल पटेल हा किरकोळ जखमी झाला असून
त्यास उपचारासाठी गोमेकॉमध्ये नेण्यात आले. कारचे मोठे नुकसान झाले आहे.









