ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वरंधाघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर भरधाव वेगातील कार नीरा देवधर धरणात कोसळली. या कारमधून 4 जण प्रवास करत होते. त्यामधील एक जण थोडक्यात बचावला असून, तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार वरंधा घाटातून निघाली होती. पहाटेच्या सुमारास दाट धुके आणि पावसामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार कठडा तोडून नीरा देवधर धरणात कोसळली. या कारमधून 4 जण प्रवास करत होते. हे सर्वजण रावेर येथील रहिवाशी होते. त्यामधील एक जण थोडक्यात बचावला. घटनेनंतर रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून उर्वरित तिघांचा शोध घेण्यात येत होता. या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.









