प्रतिनिधी,रायगड
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या हद्दीत निसर्ग हॉटेल समोर आज सकाळी ६:५० च्या सुमारास एमजी दोन कारची सामोरा समोर धडक बसून अपघात झाला .या अपघातात एका कारचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये खेड (जिल्हा रत्नागिरी) मधील दोघेजण जखमी झाले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत खेड ते मुंबई जाणाऱ्या कारची सकाळी ६:५० च्या सुमारास जोराची धडक झाली.या अपघातात एका कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात संतोष रामचंद्र पाटणे(वय-५३), सुनील दत्ताराम चव्हाण (वय-५४ ) दोघेही राहणार खेड जिल्हा रत्नागिरी हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक मदत पोलीस, महाडचे पोलीस निरीक्षक संजय भोसले आणि पोलीस नाईक अजय मोहिते घटनास्थळी हजर झाले. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा लगतच असलेले महाड तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा उदासीन झाली आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही अंतरावरच हा अपघात झाला होता. आरोग्य केंद्र बंद असल्याने जखमींवर महाडमध्ये उपचार करावे लागले.









