नवी दिल्ली : सोमालियाच्या शिक्षण मंत्रालया समोरच्या एका व्यस्त बाजारपेठेत स्फोट झाल्याने किमान १०० लोक ठार आणि ३०० लोक जखमी झाले आहेत, असे सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख मोहमुद यांनी सांगितले, हा स्फोट दोन कारमध्ये ठेवलेल्या बॉम्ब मुळे झाला असून मृतांची संख्या वाढू शकते अशी भितीही प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मोगादिशू शहराचा के५ हा केंद्रबिंदू सामान्यतः अन्न, कपडे आणि पाणी यापासून परदेशी चलन मादक पदार्थांच्या खरेदी आणि विक्री करणार्या लोकांच्या गर्दीने भरलेला असतो. पहिला स्फोट दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शिक्षण मंत्रालयात झाला. या स्फोटानंतर आपत्तकालिन व्यवस्था आणि रुग्णवाहिका जाग्यावर ताबडतोब आल्या. पहिल्या स्फोटातील पीडितांना मदत करण्यासाठी अनेक लोक जमा झाल्यावर दहसवाद्यांनी लगेच दुसरा स्फोट घडवून आणला. दुसऱ्या स्फोटामुळे बऱ्याच प्रमाणात हानी झाली.
ऑक्टोबर २०१७ मध्ये याच चौकात ट्रकमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर किमान ५००हून अधिक लोक मारले गेले होते. या हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारली नसली तरी सोमालियाच्या अध्यक्षांनी इस्लामी अल कायदाशी संबंधित असलेला अल शबाब या दहशतवादी गटाला जबाबदार धरले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









