या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघेजण सुखरूप बचावले आहेत.
उमरगा : हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाबका गावाजवळ एका चारचाकीला अचानक आग लागली. या घटनेत एका व्यक्तीचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघेजण सुखरूप बचावले आहेत. ही घटना शिर्डीहून दर्शन घेऊन हैदराबादला परत जाताना घडली. मयत सुरेश कुमार हैदराबाद येथील शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्यासह टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी कारने अचानक पेट घेतला. गाडीतील तिघांपैकी एका व्यक्तीला बाहेर पडता न आल्याने त्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. अन्य दोघे जण वेळीच गाडीबाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.








