वृत्तसंस्था/नवी दिल्ली
6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅडलेडच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा नियमीत कर्णधार रोहीत शर्मा खेळणार असल्याचे बीसीसीआयच्या सुत्राने सांगितले.
शर्माच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पर्थची पहिली कसोटी भारताला जिंकून दिली. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता भारतीय संघ या विजयामुळे आघाडीवर आहे. पर्थच्या पहिल्या कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी तसेच फलंदाजांनीही दर्जेदार कामगिरी केल्याने आता भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिकच वाढला असून अॅडलेडची दुसरी कसोटी अधिक रंगतदार अपेक्षित आहे. ही कसोटी दिवसरात्रीची खेळविली जाणार आहे.









