वृत्तसंस्था / मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी खेळविण्यात आलेल्य मुंबई इंडियन्स विरद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार रजत पाटीदारला 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
या सामन्यात आरसीबीने मुंबईचा 12 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार पाटीदारने 32 चेंडूत जलद 64 धावा झोडपल्या होत्या. या विजयामुळे आरसीबीचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता त्यांचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर 10 एप्रिलला खेळविला जाणार आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात आरसीबीला षटकांची गती राखता न आल्याने आयपीएलच्या नियमानुसार कर्णधार पाटीदारला 12 लाख रुपयांचा दंड जाहीर केला आहे.









