प्रतिनिधी/ बेळगाव
कॅपिटल वन सोसायटीच्यावतीने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धांना शनिवार दि. 4 पासून सुरुवात झाली. यावेळी सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत चषकांचे अनावरण कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात पार पडले.
कॅपिटल वन सोसायटीच्यावतीने दरवर्षी एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी सायंकाळी 5 वाजता चषकांचे अनावरण करण्यात आले. कोनवाळ गल्लीतील लोकमान्य रंगमंदिरात स्पर्धेचा शनिवार हा पहिला दिवस असून सात दिवस ही स्पर्धा चालणार आहे. शनिवारच्या एकांकिका स्पर्धेमध्ये डॉ. डी. वाय. पाटील पॉली कोल्हापूर या संघाने ट्रेलर एकांकिका सादर केली. परिवर्तन कला फौंडेशन कोल्हापूर या संघाने कलम 375 ही एकांकिका सादर केली.
दृष्टी पुणे हिने ओळख ही एकांकिका सादर केली. तर अभय थिएटर अकादमी गोवा या संघाने दशावतार ही एकांकिका सादर केली. यावेळी परीक्षक म्हणून रविदर्शन कुलकर्णी, केदार सामंत, यशोधन गडकरी यांनी काम पाहिले.









