गुंतवणूक वाढविण्यासाठी ठरणार सहाय्यभूत
आगामी अर्थसंकल्पात सरकार विमाक्षेत्राची कक्षा वाढविण्यासह बाजारात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कॅपिटल गेन टॅक्सच्या (भांडवली उत्पन्नावरील कर) दरात बदल करू शकते. तज्ञांनुसार सध्या शेअरबाजारात वर्षभरात समभागांच्या विक्रीतून नफा मिळविल्यास 30 टक्क्यांपर्यंत कर भरावा लागतो. या कराला गुंतवणूक अत्याधिक मानत आहेत, या करामुळे छोटे गुंतवणुकदार गुंतवणुकीतून मागे हटत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
भांडवली बाजारात छोटय़ा गुंतवणुकदारांचा सहभाग वाढविण्यासाठी सरकार कॅपिटल गेन टॅक्सचे प्रमाण कमी करू शकते. गुंतवणुकदार सर्वसामान्यपणे नफ्यावर कमी कर आकारल्या जाणाऱया गुंतवणुकीकडे अधिक आकर्षित होत असतात. भांडवली बाजारात छोटय़ा गुंतवणुकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यांच्याचमळे 8 कोटीहून अधिक डी-मॅट अकौंट्स उघडण्यात आली आहेत. कर अधिक राहिल्यास हे गुंतवणूकदार दुसऱया पर्यायाकडे वळू शकतात.
विमा क्षेत्राची कक्षा वाढविण्यासाठी सरकार अनेक मोठे निर्णय घेऊ शकते. विमा नियामकाकडून सरकारला यासंबंधी प्रस्ताव देण्यात आले आहेत. यात विमा कंपनी सुरू करण्यासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमी करणे सर्वात अधिक महत्त्वपूर्ण आहे. गुंतवणुकीची मर्यादा हटविण्यात आल्यास या क्षेत्रात छोटय़ा कंपन्या सामील होऊ शकतात.









