कोल्हापूर :
राज्यातील संवेदनशील असणाऱ्या कळंबा कारागृहात गेल्या सहा महिन्यात 88 बंदीजन कारागृहात वाढले आहेत. कळंबा कारागृहातील बंदीजनाची क्षमता 1699 असताना कारागृहात 2124 बंदीजन आहेत. बंदोबस्तासाठी तब्बल 146 अधिकारी आणि कर्मचारी कमी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे कारागृहातील बंदोबस्ताचे नियोजन करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
कळंबा कारागृहामध्ये मुंबई, पुणे यासह राज्यासह देशभरातील नामचिन गुंड शिक्षा भोगत आहेत. खून, मारामारी, दरोडा यासह बॉब्मस्फोट अशा गंभीर घटनांमधील कैदी आहेत. कळंबा कारागृह 24 एकर जागेत पसरला असून 8 सर्कल असून, 1 अंडा सेल आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1699 असून यामध्ये 2124 हून अधिक बंदीजन शिक्षा भोगत आहे. कळंबा कारागृहात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासहृ मुंबई, सोलापूर येथील शिक्षाधिन बंदी आहेत. याचसोबत 11 परदेशी बंदीही शिक्षा भोगत आहेत.
कर्मचाऱ्यांना कैद्यांची वैद्यकीय तपासणी, कारागृहातील विविध व्यवसाय व त्या ठिकाणी काम करणाऱ्या बंदीजनांवर देखरेख, नातेवाईकांच्या भेटी गाठी, कोर्ट साक्ष अशी विविध कामांचे नियोजन करावे लागत आहे. कारागृहात रिक्त असणाऱ्या किंवा मंजूर पदे कमी असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. 132 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दोन शिफ्टमध्ये कामाचे नियोजन करावे लागत आहे.
- बिंदू चौक सबजेलमध्येही 43 बंदी जास्त
बिंदू चौक सबजेलमध्ये कोल्हापूर जिह्यातील कच्चे कैदी येतात. अंडर ट्रायल असणारे सर्व कैदी बिंदू चौक जेलमध्ये पाठविण्यात येतात. बिंदू चौक जेलची क्षमता 105 असून सध्या 148 बंदीजन आहेत. या ठिकाणीही कर्मचारी संख्या अपुरी आहे. केवळ 30 कर्मचारी कर्तव्यासाठी असून, त्यांना दोन शिफ्टमध्ये विभागून ड्यूटी देण्यात येते.
- भरती सुरु, लवकरच रिक्त पदे भरणार
कळंबा कारागृहासह राज्यातील अनेक कारागृहामध्ये अधिकारी व कर्मचारी संख्या कमी असल्याने कारागृह प्रशासनाने राज्यातील कारागृहांसाठी 2 हजार पदांची भरती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु असून, लवरकरच हे कर्मचारी कर्तव्यावर हजर होणार आहेत.
-नागनाथ सावंत, कारगृह अधिक्षक, कळंबा कारागृह
- मंजूर पदे
अ.क्र पदनाम मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 अधीक्षक 1 1 0
2 अतिरिक्त अधीक्षक 1 1 0
3 वैद्यकीय अधिकारी 2 1 1
4 कार्यालयीन अधीक्षक 1 0 1
5 तुरुंगाधिकारी श्रेणी1 8 8 0
6 तुऊंगाधिकारी श्रेणी 2 21 5 16
7 सुभेदार 6 5 1
8 हवालदार 122 120 2
9 शिपाई 209 76 133
एकूण 363 217 146
- डिसेंबर 2024 बंदीजन
क्षमता : 1699
पुरुष : 1974
महिला : 55
परदेशी : 7
एकूण : 2036
- जुन 2025 बंदीजन
क्षमता : 1699
पुरुष : 2034
महिला : 79
परदेशी : 11
एकूण 2124








