हस्तांतर करण्याकडे वर्ष झाले तरी कानाडोळा
बेळगाव : स्मार्टसिटी योजनेंतर्गत रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास करण्यात आला. मात्र स्वच्छता आणि देखभालीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डने दुर्लक्ष केल्याने अस्वच्छतेचे आगार बनले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने कानाडोळा केल्याने सध्या हे बसस्थानक अवैध कारभार आणि अस्वच्छतेचा अ•ा बनला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड याकडे लक्ष देईल का? असा मुद्दा सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महापालिकेसह कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱ्या बसथांब्यांचा आणि बसस्थानकाचा विकास केला आहे. कोट्यावधी निधी खर्च करून रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानकाचा कायापालट करून स्मार्ट बसस्थानक बनविले आहे. त्याचप्रमाणे धर्मवीर संभाजी चौक परिसरात स्मार्ट बसथांबा निर्माण करण्यात आला आहे. मात्र या दोन्हीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डने कानाडोळा केला आहे. धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्यावर अस्वच्छता निर्माण होत असून शेजारी असलेल्या ई टॉयलेटजवळ कचऱ्याचा ढिगारा साचला आहे. त्याठिकाणी भटकी जनावरे बसून घाण करीत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचप्रमाणे रेर्ल्वेंस्थानकाचा विकास करण्यापूर्वी येथील कारवार बसस्थानकाचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधी खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट बसस्थानक निर्माण करून याठिकाणी बस थांबण्यासाठी फलाट आणि प्रवाशांना बसण्यासाठी आसनसुविधा आणि बारा व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. मात्र येथील सहा गाळ्यांना बोली लागली नसल्याने बसस्थानकाच्या देखभालीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डने दुर्लक्ष केले आहे. बसस्थानकावर कचऱ्याचा ढिगारा साचत असून निराश्रीत नागरिक याठिकाणी आसरा घेत आहेत. रात्रीच्यावेळी मद्यपी लोक बसत असल्याने हे बसस्थानक अवैध कारभाराचा अ•ा बनला आहे. काही वेळा येथील दिवे सुरू ठेवले जातात तर बहुतांश वेळ बंद असतात. त्यामुळे या बसस्थानकाचा दुरुपयोग होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले असल्याने सर्वत्र कचरा पसरला आहे. अस्वच्छतेचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ठिकाणी बसून बससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने स्वच्छता करण्यासह आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









