बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित 12 व्या फिनिक्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एमव्हीएम, कॅन्टोन्मेंट, सेंट झेवियर्स, इस्लामिया संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. होनगा येथील फिनिक्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एमव्हीएमने मराठी विद्यानिकेतनचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात आठव्या मिनिटाला स्वप्निलच्या पासवर आर्यन सिंगने गोल करून 1-0 आघाडी मिळून दिली.19 व्या मिनिटाला मराठी विद्यानिकेतनच्या स्वप्नलिने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. दुसऱ्या सत्रात 27 व्या मिनिटाला आर्यन सिंगच्या पासवर आयुषने दुसरा गोल केला. तर 34 व्या मिनिटाला आयुष्य पासवर स्वप्निलने तिसरा गोल करून 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सामन्यात कॅन्टोन्मेंट संघाने फिनिक्स होनगाचा 4-0 असा पराभव केला. 11 व 17 व्या मिनिटाला कॅन्टोन्मेंटच्या सुरेशने सलग दोन गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 23 व्या मिनिटाला सुरेशच्या पासवर अनुषने तिसरा गोल तर 29 व्या मिनिटाला काविशने चौथा गोल करून 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात सेंट झेवियर्सने विजया संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 15 व 21 व्या मिनिटाला झेवियरच्या योहानच्या पासवर माहीदने सलग दोन गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. 26 व्या मिनिटाला माहीदच्या पासवर योहानने तर 32 व्या मिनिटाला झोयानने चौथा गोल करून4-0 ची आघाडी मिळवून दिली.
पाचव्या सामन्यात इस्लामियाने ज्योती सेंट्रलचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात सातव्या मिनिटाला अब्दुल्लाने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 17 व 22 व्या मिनिटाला इस्लामियाच्या सलमानने सलग दोन गोल करून 3-0 आघाडी मिळवून दिली. 34 व्या मिनिटाला इस्लामियाच्या रेहानने चौथा गोल केला. पाचव्या सामन्यात एमव्हीएमने कनक मेमोरिअलचा 2-1 पराभव केला. या सामन्यात मिनिटाला एमव्हीएमच्या चैतन्याच्या पासवर प्रणवने पहिला गोल केला. तर 21 व्या मिनिटाला प्रणवच्या पासवर चैतन्य दुसरा कॉल करून 2-0 आघाडी मिळवून दिली. 24 व्या मिनिटाला कणकच्या झेनने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. सहाव्या सामन्यात पॅन्टोन्मेंटने सेंट पॉल्सचा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्याच्या 17 व्या मिनिटाला कॅन्टोन्मेंटच्या सुरेशच्या पासवर आफताबने गोल करून 1-0 आघाडी मिळवून दिली. सेंटपॉल्सने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्याला अपयश आले.









