आमदार सेठ-अधिकाऱ्यांकडून पाहणी
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी जुन्या भाजी मार्केट जागेची बेळगाव उत्तरचे आमदार व कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली. सध्या या ठिकाणी भाजी मार्केट नसल्याने वापराविना पडून आहे. त्यामुळे पार्किंग व इतर सुविधांसाठी जागा उपब्लध करून दिल्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनाला महसूल उपलब्ध होईल, या दृष्टीने चर्चा करण्यात आली. कॅन्टोन्मेंट जुन्या भाजी मार्केट वर्षभरापूर्वी पाडण्यात आले. जीर्ण झालेले दुकानगाळे काढून त्याठिकाणी सपाटीकरण करण्यात आले. मागील काही वर्षापासून ही जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे या जागेचा पुनर्वापर व्हावा, यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ प्रयत्नशील आहेत. यापूर्वीच्या कॅन्टोन्मेंट बैठकीत ही जागा पार्किंगसाठी वापरावी, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार काम सुरू ठेवण्यात आले आहे. सोमवारी आम. सेठ, कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार, अभियंता सतीश मण्णूरकर यांच्यासह इतरांनी जागेची पाहणी केली. यावेळी काही नागरिकांनी येथील समस्या आमदारांसमोर मांडल्या.









