गोकाक तालुक्मयात कारवाई, 26 किलो गांजा जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
उसाच्या मळय़ात गांजाचे पीक घेतलेल्या एका शेतकऱयाला अटक करण्यात आली आहे. सोमवारी डीसीआरबी व जिल्हा सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी गोकाक तालुक्मयातील मिडकनट्टी येथे ही कारवाई केली असून 26 किलो ओला व सुका गांजा जप्त केला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. परप्पा शिवलिंगप्पा सवसुद्दी, रा. मिडकनट्टी असे पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. उसाच्या मळय़ात त्याने गांजा पिकविला होता. डीसीआरबीचे पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, जिल्हा सीईएनचे पोलीस उपनिरीक्षक नागनगौडा कट्टीमनी गौडर व सहकाऱयांनी ही कारवाई केली. पोलिसांनी 4 किलो 300 ग्रॅम सुका गांजा तर 21 किलो 500 ग्रॅम ओला गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत 2 लाख 58 हजार रु. इतकी होते. गोकाक ग्रामीण पोलिसात प्रकरणाची नोंद झाली आहे.









