राधानगरी / प्रतिनिधी
मराठा आरक्षण मिळावे यासाठी राधानगरी येथे आज सायंकाळी 7 वाजता पंचायत समिती,मार्केट चौक, एस टी स्टँड,बाजारपेठ ते नवी पेठ अंबाबाई मंदिर शहरातील प्रमुख मार्गावरून कॅडल मार्च मोर्चा काढण्यात आला. तसेच एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्कच नाही कुणाच्या बापाचं, मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अश्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, यावेळी पाचशेहून अधिक शहरवासीय व विशेषत तरुण मुलांनी सहभाग घेतला होता.तसेच जोपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळत नाही.तो पर्यत हा संघर्षलढा चालू राहील अशी प्रतिक्रिया सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
कॅन्डल मार्च नंतर अंबाबाई मंदिरात बैठक घेण्यात आली या बैठकीत कोल्हापूर येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उद्या मंगळवारी सर्व ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.प्रा,पी.एस.पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सुहास निंबाळकर, विक्रम पालकर, तानाजी चौगले, प्रकाश बालनकर, बाळासो कळमकर, सचिन लाड, उत्तम पाटील, प्रकाश चव्हाण, अमित पाटील, अमर वाडकर, मच्छिंद्र कातकर, सुनिल कांबळे,मंगेश राऊत, संजय मुरगुडे , विठ्ठल चव्हाण,,अनिल पताडे, प्रसाद डवर, संदेश रासम यांच्यासह सकल मराठा समाजाचे बांधव या कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते . कॅन्डल मार्च वेळी राधानगरी पोलीस ठाण्याच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









