मुला-मुलींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
युवकांचे लाक्षणिक उपोषण
सांगरूळ प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी सांगरूळ (ता.करवीर) येथे शनिवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कॅन्डल मोर्चा काढण्यात आला . लहान शालेय मुला-मुलींच्या पासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत शेकडो ग्रामस्थांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला. तसेच गावातील युवक माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी नाळे व बांधकाम अभियंता जनार्दन खाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एक दिवसाची लाक्षणिक उपोषण केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाला पाठिंबा देण्याचा पहिला टप्पा म्हणून हा कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. येथील बाजारवाडा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देत कॅण्डल मोर्चाला सुरुवात झाली .गावातील मेन रोड वरून मोर्चा येऊन गावातील गल्यांच्या मार्गावरून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले .यावेळी बोलताना संतप्त युवकांनी मराठा समाजावर आज पर्यंत आरक्षणाच्या बाबतीत मोठा अन्याय झाला आहे .यामुळे या पाठीमागच्या अनेक पिढ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मनोज जरांगे पाटलांसारख्या एका सर्वसामान्य मराठा कार्यकर्त्यांने मराठा आरक्षणाची मशाल पेटवली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपला प्राण पणाला लावलेला आहे .मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला सांगरूळ ग्रामस्थांच्या वतीने पाठबळ देण्याचा निर्धार युवकांनी यावेळी व्यक्त केला. लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार काही युवकांनी केला आहे .
गावातील युवक माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी नाळे व बांधकाम अभियंता जनार्दन खाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एक दिवसाची लाक्षणिक उपोषण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हे उपोषण सुरू करण्यात आले . गावातील सर्व पक्षिय नेते कार्यकर्ते व युवकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला









