बेळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समिती भाषिक न्याय हक्कासाठी लढा देत असून आपली लोकेच्छा व्यक्त करण्यासाठी निवडणूका लढवित असते. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये बेळगाव उत्तर व दक्षिण या दोन्ही मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीला पोषक वातावरण असून मोठ्या मत्ताधिक्क्याने उमेदवार विजयी करण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. मंगळवारी मराठा मंदिर येथे झालेल्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात आले.








