जिल्हा कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
एनपीसीडीसीएस/एनपीएचसीई आणि एनपीपीसी कार्यक्रमांतर्गत कंत्राटीतत्त्वावर तज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि स्वीय साहाय्यक नेमणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. दि. 11 रोजी होणारी थेट नेमणूक मुलाखत रद्द करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
उपरोक्त योजनेंतर्गत दि. 11 रोजी थेट नेमणुकीच्या आधारावर तज्ञ डॉक्टर व परिचारिकांची मुलाखत घेण्यात येणार होती. सदर प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकल्याने रद्द करण्यात आली आहे. कंत्राटी नेमणुकीच्या आरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याबाबत दावा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सदर मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी तसेच नेमणूक समिती अध्यक्ष यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.









