कारवार: कारवार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. उत्तर कन्नड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी कारवार येथील सिद्धिविनायक पुरातन आणि ऐतिहासिक अशा देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेऊन पुजन केले. याप्रसंगी कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार शतीश सैल तसेच हल्याळचे आमदार आर.व्ही देशपांडे व इतर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
Previous Articleराज्यात काँग्रेस 20 जागांवर विजय मिळविणार
Next Article मुंगूल-मडगाव अपघातात झारखंडचे दोघे युवक ठार









