रुग्णांना जलद-सुरक्षित पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वाची
बेळगाव : केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरला कॅनरा बँकेतफे रुग्णवाहिका देणगी स्वरुपात देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते केले. यावेळी बोलताना डॉ. कोरे म्हणाले, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी कॅनरा बँकेने केएलई हॉस्पिटलला रुग्णवाहिका दिली. रुग्णांना जलदरीत्या व सुरक्षित रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावेल. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे रुग्णांना उत्तम सुविधा देणे शक्य होते. त्यामुळे इतर संघ-संस्थांनीही याचे अनुकरण करावे. याप्रसंगी केएलईचे कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, डॉ. एम. एस. गणाचारी, डॉ. व्ही. डी. पाटील, मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या एन. एस. महांतशेट्टी, डॉ. राजेश पवार, डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, डॉ. एम. दयानंद, डॉ. एम. व्ही. जाली, केएलईचे बँकिंग व्यवहार प्रमुख बसवराज जेवरागीकर, वर्षा चिल्लाळ, बँकेचे हुबळी विभागीय प्रमुख एल. आर. विजयश्री यासह इतर उपस्थित होते.









