भारताने 2021 च्या निवडणुकीत हस्तक्षेप केला नसल्याची पुष्टी, चीनच्या जोरावर ट्रुडो विजयी?
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडासोबतच्या तणावादरम्यान भारताने कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला नसल्याची पुष्टी झाली आहे. कॅनडाच्या अधिकृत तपास अहवालानुसार देशातील 2021 च्या निवडणुकांचे निरीक्षण करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे भारताच्या हस्तक्षेप किंवा प्रभावाबाबत कोणतीही माहिती आढळली नाही. मात्र, कॅनडाच्या गुप्तचर संस्थेच्या तपासात देशातील गेल्या दोन निवडणुकांमध्ये चीनने हस्तक्षेप केल्याचे निष्पन्न झाले आहे. पॅनडामध्ये 2019 आणि 2021 मध्ये झालेल्या दोन फेडरल निवडणुकांमध्ये चीनने हस्तक्षेप केला होता, असा दावा गेल्यावषी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात करण्यात आला होता.
भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी 2019 आणि 2021 मध्ये पॅनडाच्या फेडरल निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, भारताने हा दावा पूर्णपणे फेटाळला असतानाच आता पॅनडाच्याच कागदपत्रांनी याचा पर्दाफाश केला आहे. पॅनडाच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेपाच्या आरोपांच्या अधिकृत तपासात भारताने पॅनडाच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही, असा निष्कर्ष काढला आहे. पॅनडाच्या राज्य माध्यम सीबीसीने पॅनडाच्या सिक्मयुरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसेसच्या (सीएसआयएस) दाव्याचे आता यासंबंधी वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पॅनडाचा निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा दावा फेटाळून लावला होता.
देशातील 2021 च्या निवडणुकांवर देखरेख ठेवणाऱ्या पॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पॅनेलला राष्ट्रीय निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी भारताकडून कोणत्याही प्रयत्नांची माहिती देण्यात आली नव्हती, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने चौकशी समितीला सांगितले. 2021 च्या निवडणुकीत भारताकडून प्राप्त साधनांचा वापर झाल्याचा पुरावा आम्हाला दिसला नाही. मात्र, पॅनडाच्या गुप्तचर संस्थेला गेल्या दोन निवडणुकांमध्ये चीनने हस्तक्षेप केल्याचे आढळून आल्याचे सदर अधिकाऱ्याने आपल्या साक्षीदरम्यान स्पष्ट केले. आता याप्रकरणी ट्रुडो यांची साक्षही नोंदविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकशीसाठी आयोग नियुक्त
पॅनडाच्या सिक्मयुरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसने भारतावर आरोप केल्यानंतर काही दिवसांनी हे सत्य समोर आले आहे. 2019 आणि 2021 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीने बाजी मारली होती. या निवडणुकीत चीनच्या भूमिकेचे वृत्त आल्यापासून पॅनडातील विरोधक संतप्त झाले आहेत. प्रसारमाध्यमांच्या दाव्यावर नाराज असलेल्या विरोधी आमदारांच्या दबावाखाली ट्रुडो यांनी परकीय हस्तक्षेपाची चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन केला होता.
भारताने यापूर्वीच फेटाळले होते दावे
कॅनडाने केलेल्या आरोपानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी फेब्रुवारीमध्ये भारताची भूमिका रोखठोकपणे मांडली होती. ‘पॅनडाचे आरोप निराधार आहेत. इतर देशांच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करणे हे भारत सरकारचे धोरण नाही. पॅनडाच आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. आम्ही पॅनेडियन कमिशनच्या तपासाशी संबंधित मीडिया रिपोर्ट्स पाहिले आहेत. पॅनडाच्या निवडणुकीत भारताच्या हस्तक्षेपाचे बिनबुडाचे आरोप आम्ही ठामपणे नाकारतो’, असे त्यांनी सांगितले होते. या आरोपांपूर्वी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून भारत आणि पॅनडामध्ये तणाव निर्माण झाला होता.
चीनवर आरोप
2021 च्या निवडणुकीतही चीनी मुत्सद्दी आणि प्रॉक्सी मोहिमांना अघोषित पैसा देण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. टोरंटोमधील चिनी वाणिज्य दुतावासातून निवडणुकीतील हस्तक्षेपाची कारवाई सुरू होती. निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी भारत आणि चीनशिवाय रशियाचेही नाव घेण्यात आले. मात्र, सध्या तपास संस्थेच्या अहवालात रशियाबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.