वृत्तसंस्था/ ओटावा
एअर कॅनडाने स्वत:च्या काही विमानांनी इन-फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टीमवर (आयएफई) इस्रायलला देश म्हणून प्रदर्शित न करण्याची माफी मागितली आहे. कॅनडाच्या एअरलाइनने बोइंग 737 मॅक्स ताफ्याने इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायलच्या जागी पॅलेस्टिनी क्षेत्र असे नाव नमूद केले होते. हा प्रकार एका प्रवाशाने एअरलाइनला निदर्शनास आणून दिला होता.
विमानांमध्ये चुकीचे नकाशे होते, ज्यांना अपडेट करण्यात आल्यावर निष्क्रीय करण्यात आले आहे. थेल्सने संबंधित आयएफईचे उत्पादन केले होते, परंतु मॅप एका तिसऱ्या कंपनीकडून खरेदी करण्यात आले होते असा दावा एअरोस्पेस समुहाकडून करण्यात आला.
एअर कॅनडा आणि थेल्स या कंपनीने याप्रकरणी संयुक्त वक्तव्य जारी केले आहे. एअर कॅनडाचे धोरण सामान्य स्वरुपात स्वत:च्या विमानांमध्ये नकाशांवर केळ शहरांची नावे प्रदर्शित करण्याचे आहे, या विशेष प्रणालीत कॉन्फिगरेशन या धोरणानुरुप नव्हते. एअरलाइन आणि थेल्स नकाशा प्रदात्यांसोबत ही चूक दुरुस्त करण्यासाठी काम करत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले.









