वृत्तसंस्था / मॉन्ट्रियल
डब्ल्युटीए टूरवरील येथे झालेल्या नॅशनल बँक खुल्या कॅनेडीयन महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या 18 वर्षीय व्हिक्टोरिया म्बोकोने एकेरीचे जेतेपद मिळविताना जपानच्या अनुभवी नाओमी ओसाकाचा पराभव केला.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात म्बोकोने 27 वर्षीय ओसाकाचा 2-6, 6-4, 6-1 अशा सेटमध्ये पराभव केला. म्बोकोचे डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील पहिले जेतेपद आहे. या स्पर्धेत कॅनडाच्या नवोदित म्बोकोने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेती सोफीया केनिनचा तर चौथ्या फेरीत अमेरिकेच्या फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम विजेत्या कोको गॉफचा तर उपांत्य लढतीत इलीना रायबाकिनाचा पराभव केला.









