वृत्तसंस्था / ओसाका (जपान)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या जपान खुल्या महिलाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या लैला फर्नांडीसने एकेरीची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या लढतीत तिने सिरेस्टीचा पराभव केला.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या एकेरीच्या उपांत्य सामन्यात फर्नांडीसने 35 वर्षीय सोराना सिरेस्टीचा 6-1, 2-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. आता जेतेपदासाठी फर्नांडीसची लढत जॅक्वेलेनी ख्रिस्तेन आणि 18 वर्षीय व्हॅलेन्टोव्हा याच्ंयातील विजयी खेळाडूबरोबर होणार आहे. या स्पर्धेत शुक्रवारी जपानची टॉपसिडेड ओसाकाने डाव्याला पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. फर्नांडीसने 2021 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या चायना खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफने फर्नांडीसचा दुसऱ्या फेरीत पराभव केला होता.









