वृत्तसंस्था/ ओसाका (जपान)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या जपान खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या लैला फर्नांडेझने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना 18 वर्षीय व्हॅलेन्टोव्हाचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात फर्नांडिजने टेरेझा व्हॅलेन्टोव्हाचा 6-0, 5-7, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत जेतेपद हस्तगत केले. फर्नांडेझचे वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे पाचवे विजेतेपद आहे. या लढतीमध्ये लैलाने पहिला सेट केवळ 29 मिनिटात 6-0 असा एकतर्फी जिंकला. त्यानंतर टेरेझाने दुसऱ्या सेटमध्ये दर्जेदार खेळ करत 7-5 असा हा सेट जिंकून सामन्याला रंगत आणली. पण तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये फर्नांडेझने आपल्या अनुभवाच्या जोरावर टेरेझाचे आव्हान संपुष्टात आणले.
…..









