भारताच्या निर्णयाचे कॅनडाकडून स्वागत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली, टोरंटो
कॅनडा आणि इतर देशांमधून अर्ज करणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी गुऊवारपासून काही श्रेणींच्या व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तांनी व्हिसा पुरविण्याची सेवा पूर्ववत करण्यात येत असल्याची माहिती दिली. व्यवसाय व्हिसा, वैद्यकीय व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसा श्रेणींसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत. शीख फुटीरतावादी निज्जरच्या हत्येवरून राजनयिक वादात कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केल्याच्या एका महिन्याहून अधिक कालावधीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून झालेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर, कॅनडाने गुऊवारपासून देशात काही व्हिसा सेवा पुनर्संचयित करण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. बऱ्याच पॅनेडियन लोकांसाठी चिंतेची वेळ आल्यानंतर हे एक ‘चांगले लक्षण’ असल्याचे कॅनडाने म्हटले आहे.
कॅनडाने अलीकडील काही पावले पाहता सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, 26 ऑक्टोबरपासून प्रवेश व्हिसा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात यासंबंधी माहिती दिली. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात 18 जून रोजी झालेल्या निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा ‘संभाव्य’ सहभाग असल्याबाबत पॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या महिन्यात भारत आणि पॅनडामधील तणाव वाढला होता. यानंतर, पॅनडा आणि इतर देशांमध्ये पॅनडाच्या नागरिकांसाठी सेवा निलंबित करण्यात आली. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. भारताने ट्रुडो यांनी केलेले आरोप कठोर शब्दात फेटाळून लावले होते.









