वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्यावरील नवीन अहवालानुसार, कॅनडातून किमान दोन खलिस्तानी अतिरेकी गटांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. ’कॅनडामधील मनी लाँडरिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याच्या धोक्याचे 2025 चे मूल्यांकन’ या शीर्षकाच्या अहवालात कॅनडामधून आर्थिक पाठबळ मिळवणाऱ्या खलिस्तानी अतिरेकी गटांची नावे बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन अशी देण्यात आली आहेत. ओटावाच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले होते की, 80 च्या दशकाच्या मध्यापासून कॅनडामध्ये राजकीयदृष्ट्या प्रेरित हिंसक अतिरेक्यांचा धोका निर्माण झाला आणि खलिस्तानी अतिरेक्यांमार्फत तो वाढीस लागला. ते हिंसक मार्गांचा वापर करून भारतातून वेगळे काढून खलिस्तान नावाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे त्यात नमूद केले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी हा अहवाल आला आहे.









